Elephant fighter Sathmari

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on tumblr
Tumblr
Share on pinterest
Pinterest
Share on pocket
Pocket

खवळलेल्या हत्तीला चकवा देणारी साठमारी

हत्ती पाळीव प्राणी म्हणून बघायला खूप चांगला वाटतो ; पण खवळलेला हत्ती जीवघेणाच ठरू शकतो.

त्यामुळे खवळलेल्या हत्तीच्या नादाला कोणी लागत नाही किंवा अशा हत्तीच्या वाऱ्यालाही कोणी थांबत नाही; पण कोल्हापूर त्याला अपवाद होते.

येथे चक्क खवळलेल्या हत्तीला पुन्हापुन्हा खवळले जात होते आणि तो अंगावर धावून आला की, त्याला चकवा देण्याचा एक साहसी खेळ खेळला जात होता.

कुस्ती , फुटबॉलसारख्या खेळाच्या कोल्हापुरात हत्तीच्या या साठमारीचा खेळही एक काळ खूप जपला गेला होता.

– सुधाकर काशीद

Sathmari Kolhapur

रावणेश्वर तलावाच्या काठावर म्हणजे शाहू स्टेडियमच्या एका बाजूला लॉन टेनिसचे एक मैदान आहे. हे मैदान म्हणजे पूर्वांची साठमारी.

आज तेथे टेनिसच्या चेंडूला इकडून तिकडे टोलवले जाते. तेथे इकडून तिकडे धावणाऱ्या हत्तीला बिथरवून खेळवले जात असे.

काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या खेळाच्या स्मृती आज काही अंशी जिवंत आहेत; पण आपण कोल्हापूरकर किती साहसी खेळ खेळत होतो, हे नव्या पिढीला कळण्याची गरज आहे.

शाहू स्टेडियमच्या टेनिस कोटींवर आजही या साठमारीचे अवशेष आहेत.

साठमारीचा मुख्य प्रवेश मार्ग इंगवल्यांच्या चाळीसमोर आहे. या प्रवेशद्वारावर हत्तीच्या दोन दगडी मूर्ती आहेत.

त्या दरवाजातून हत्ती साठमारीच्या मैदानात आणला जायचा. मैदानात बरुजाच्या आकाराचे छोटे – छोटे आडोसे होते.

या आडोशात हत्तीला खेळवणारे दडून बसत. खवळलेला हत्ती मैदानात सोडला, की त्याला दडून बसलेले हे खेळेकरी दिसत नसत.

नेमकी ही संधी घेत काही खेळेकरी झपकन बुरुजाबाहेर येऊन हत्तीला भाल्याने टोचत असत व हत्ती अंगावर येण्याआधी पुन्हा बुरजाच्या छोट्या दरवाजातून आत जाऊन दडत बसत.

काही धाडसी खेळकरी हत्तीसमोर जात. त्याला भाल्याने टोचत व हत्ती अंगावर येऊ लागला की दडून बसत. हत्तीला चकविण्याचा हा खेळ तास – दीड तास चालत असे.

हा खेळ पाहण्यासाठी मैदानाच्या तटावर मोठी गर्दी असायची. या खेळाचा प्रत्येक क्षण काळजाला धडकी भरविणारा असे;

पण राजर्षी छत्रपती शाह महाराज, राजाराम महाराजांनी या साहसी खेळाचे जतन केले होते.

धाडसाला चपळाईची जोड

या खेळात फक्त धाडस असून चालत नव्हते. धाडसासोबत चपळाई पण तितकीच महत्वाची होती.

चपळता नसली तर साठमारी खेळकऱ्याचा अंतच ठरलेला असे.

साठमारीचा हा खेळ शाहू महाराजांनी बडोदा येथे पाहिला व कोल्हापुरात सुरू केला. केवळ कोल्हापुरात नव्हे; तर पन्हाळा, राधानगरी येथे साठमारीचे

आखाडे बांधले.

कोल्हापुरातल्या आखाड्याचे काम २१ नोव्हेंबर १९१३ ला सुरू झाले, १४ ऑक्टोबर १९१६ रोजी संपले.

संस्थानचे अभियंता

रावसाहेब विचारे यांनी साठमारीचे भक्कम बांधकाम केले. तय्यब अली भोरी हे कंत्राटदार होते.

आज साठमारी आहे; पण त्या मैदानाता हत्तीऐवजी टे

निसचा खेळ आहे; मात्र या मैदानाच्या रूपाने साठमारीच्या आठवणींची थरार जिवंत आहे.

– सकाळ वृत्तपत्र

Address

  • राजर्षी शाहू स्टेडियम, साठमारी, मंगळवार पेठ, कोल्हापूर.
  • 0231 2641 763
  • Giverned by: Kolhapur Sports association
  • Rajarshi Shahu Stadium, Sathmari, Mangalwal Peth, Kolhapur.
  • Opening Time: 7:00 AM
  • Closing Time: 7:00 PM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *